Loksabha Election 2024 : किरण सामंत यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार

Loksabha Election 2024 : किरण सामंत यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू व सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे इच्छुक होते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व अब की बार ४०० पार करण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत, आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. (Loksabha Election 2024)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली होती. मात्र अचानक मंगळवारी रात्री आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माघार घेत आहोत, अशी त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला गेली असल्याचे दिसून येत आहे. (Loksabha Election 2024)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news