वसंत मोरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट | पुढारी

वसंत मोरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज (दि.३०) जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मोरे यांनी शुक्रवारी पुणे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी जरांगेंची भेट घेतल्याने नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.

वसंत मोरे हे मनसेचे मात्तबर नेत्यांपैकी एक होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती समजले जात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button