माेठी बातमी : ‘ज्ञानवापी’ तळघरात पूजा सूरुच राहणार, अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळल्‍या | पुढारी

माेठी बातमी : 'ज्ञानवापी' तळघरात पूजा सूरुच राहणार, अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळल्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलातील ‘व्यास तहखाना’मध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज (दि.२६) फेटाळली आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजेला परवानगी देण्‍याचा निकाल वाराणसी जिल्‍हा न्‍यायालयाने दिला हाेता. या निर्णयाविरोधात अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्‍या वतीने दोन याचिका दाखल करण्‍यात आल्‍या होत्‍या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामियाच्या आदेशावरील पहिली याचिका फेटाळून लावली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. यामुळे आता मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा सुरू राहणार आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिली हाेती पूजेला परवानगी

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पुजाऱ्यांना पूजेला परवानगी दिली होती. १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मशिदीच्या आवारात धार्मिक विधी पार पडले.नंतर दक्षिणेकडील तळ भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करण्‍यात आली होती. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयाने ही याचिका फेटाळात उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करावी, असे स्‍पष्‍ट केले होते. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्‍या वतीने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने याचिका दाखल केली होती. दरम्‍यान, १३ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्ञानवापी परिसराला भेट दिली आणि ‘व्यास का तेखाना’ येथे पूजा केली होती.

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर याबाबत निर्णय राखून ठेवला हाेता. आज त्‍यांनी ज्ञानवापी मशीद संकुलातील ‘व्यास तहखाना’मध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. त्‍यामुळे आता वाराणसी जिल्हा न्यायाधीशांचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

Back to top button