Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचे आज किल्ले रायगडावर अनावरण | पुढारी

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचे आज किल्ले रायगडावर अनावरण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी किल्ले रायगडावर अनावरण करण्यात येणार आहे. (Sharad Pawar )

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, लोकशाही वाचविण्याकरिता निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या 84 वर्षीय योद्ध्याला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. आयोगाकडे आम्ही तीन चिन्हे सुचविली होती. त्यातील चिन्ह न देता आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. यावरून निवडणुकीत लढण्यासाठी आम्हाला शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी शुभ संकेत आहे.

हेही वाचा :

Back to top button