Nashik News : आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट, कोटमगाव येथील घटना | पुढारी

Nashik News : आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट, कोटमगाव येथील घटना

लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरीसदृश्य वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे यांचे हे शेत आहे. त्यांच्या शेतात अचानक आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वारुळे वस्तीवरील शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी तत्काळ लासलगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच याबाबत लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची माहिती देताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे.

हेही वाचा :

Back to top button