Avatar : The Last Airbender – ही संधी सोडू नका, अवतार : द लास्ट एयरबेंडर पाहिला का? | पुढारी

Avatar : The Last Airbender - ही संधी सोडू नका, अवतार : द लास्ट एयरबेंडर पाहिला का?

पुढारी ऑनलाईन डेस्क – अवतार : द लास्ट एयरबेंडर (Avatar: The Last Airbender) चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. वेब सीरीज अवतार पाहण्यासाठी फॅन्स प्रतीक्षा करत होते. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २२ फेब्रुवारी, २०२४ रोजी अवतार : द लास्ट एयरबेंडर (Avatar: The Last Airbender) स्ट्रीम झाला.

अवतार : द लास्ट एयरबेंडरचा फायनल ट्रेलर

अवतार: द लास्ट एयरबेंडर, भयावह फायर नेशनचे हल्ल्यांतर्गत जगात संतुलन आणण्यासाठी अग्नी, पृथ्वी, जल आणि वायुच्या तत्वांवर हे प्रभुत्व मिळविण्यासाठी एक शोध आहे. ट्रेलरमध्ये, आंग आपल्या खांद्यावर प्रत्येकाच्या अपेक्षांचे भार घेत तो जबाबदारीच्या भावना व्यक्त करतो. शानदार, दमदार ट्रेलर पाहण्यासारखाच आहे. गॉर्डन कॉर्मियर आंगच्या भूमिकेत आहे. किआवेंटियो वॉटरबेंडर कटाराच्या रूपात अभिनय केला आहे. कटाराचा भाऊ, सोक्काच्या रूपात इयान ओस्ले; फायरबेंडिंग रॉयल्टी, जुकोच्या रूपात डलास लियू; फायर लॉर्ड ओजाईच्या रूपात डॅनियल डे किम; अंकल इरोहच्या रूपात पॉल सन-ह्युंग ली; अजुलाच्या रूपात एलिजाबेथ यू; आणि केन लेउंग कमांडर झाओच्या रूपात आहे.

काय आहे अवतार : द लास्ट एयरबेंडरची कहाणी?

या वेब सीरीजची कहाणी चार देशांमध्ये विभागलेल्या विश्वाच्या ‍अवतीभोवती फिरते. जल, पृथ्वी, अग्नी आणि वायु, प्रत्येकाची आपली एक क्षमता आहे…पुढील कहाणी तुम्हाला स्वत: पाहावी लागेल.

अवतार: द लास्ट एयरबेंडर २२ फेब्रुवारी, २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.

Back to top button