Maratha Reservation : 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करा नाही तर...जरांगेंचा सरकारला इशारा | पुढारी

Maratha Reservation : 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करा नाही तर...जरांगेंचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी (जालना) : पुढारी ऑनलाईन डेस्क – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उफोषणाचा आझ सातवा दिवस आहे. सर्वेक्षण आहवालानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी करा नाही तर आंदोलन मागे घेणार नाही, असा सरकारला इशारा दिला.

संबंधित बातम्या –

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरु झाले. २० तारखेला विशेष अधिवेशन असेल. नोंदी नसलेल्यांसाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल असेल. तिन्ही बाजूने मराठ्यांचा फायदा, ही आमची भूमिका आहे. सगेसोयरांची अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल. अंमलबजावणी होऊपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, यावर जरांगे ठाम राहिले.

राज्यातील सर्व मराठे कुणबी आहेत. मराठ्यांना फक्त वेगळं आरक्षण देऊन चालणार नाही . नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणार आहे. इतरांना कायमचं नावं ठेवणे भुजबळांची सवय आहे. मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झाली नाही. २० तारखेच्या आत सरकारने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

२० तारखेनंतर पुढील निर्णय घेणार. सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सगेसोयऱ्याच्या कायद्‌यावर आम्ही ठाम आहोत. निलेश राणेंना विनंती आहे की, नारायण राणेंना आवरा. मी राणेंवर बोललो की सोडणार नाही. राणे गुंड आहेत, सर्वसामान्य मराठ्यांना कमी समजू नका. मोदींनाही ओबीसींचा अभिमान आहे. आमचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास आहे, असे ते म्हणाले.

फक्त नोंदी सापडलेल्यांनाच प्रमाणपत्र..हा सरकारमध्ये गोड गैरसमज असेल तर दूर करावा. २० फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी न केल्यास आंदोलन हाताबाहेर जाईल, जरांगेंनी सरकारला पुन्हा इशारा दिला. नारायण राणेंनी ४ दिवस उपोषण करून दाखवावं.

Back to top button