ED Raid in Bengal : पं. बंगालमधील माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीची छापेमारी | पुढारी

ED Raid in Bengal : पं. बंगालमधील माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीची छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री आणि तुरुंगात असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने छापे टाकले आहेत. पं. बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकात्यात अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (ED Raid in Bengal)

23 जुलै 2022 मध्ये पार्थ चॅटर्जीला पश्चिम बंगालमधील शाळा सेवा आयोग (एसएससी) घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली होती. पार्थ चॅटर्जीच्या अटकेनंतर, ईडीने माजी शिक्षणमंत्र्यांच्या जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकाता निवासस्थानातून 21 कोटी रुपये रोख आणि 1 कोटींहून अधिक किमतीचे दागिने जप्त केले होते. (ED Raid in Bengal)

कथित घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

पश्चिम बंगालमधील सरकारी नोकरी घोटाळ्यात अनेक लोक सक्रिय असल्याचा दावा भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी केला. त्यांनी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर कथित ईडीची ऑडिओ क्लिपदेखील शेअर केली आहे. भाजप नेत्याने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, कालीपाद पती, एक टीएमसी नेता आणि टीएमसीचा एक एजंट (भाजप नेत्याने दावा केल्याप्रमाणे), नेते माणिक भट्टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी आणि नोकरी इच्छुक यांच्यातील संभाषण ऐकू येत आहे. (ED Raid in Bengal)

काय आहे पं. बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा?

सरकारी शाळेत शिक्षक पदासाठी त्यांनी १४ लाख रुपये भरले होते, मात्र नियुक्ती मिळाली नाही. दरम्यान पं.बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा अजूनही सुरू असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. हीच पोस्ट या नेत्याने ईडी आणि सीबीआयला टॅग करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

Back to top button