बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज उमापूर बंद | पुढारी

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज उमापूर बंद

धोडराई (बीड) – मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून सराटी अंतरवली येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उमापूर येथील मराठा समन्वयकांनी उमापूर गाव आज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या –

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत चालली आहे आणि शासन स्तरावरून कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने या उपोषणाची दखल घेऊन जरांगे-पाटील व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सगेसोयरेबाबत कायदा करण्यात यावा, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उमापूर गाव कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

Back to top button