

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गणेश जयंती निमित्त आज (दि.१३) नागपूरच्या श्री गणेश टेकडी मंदिर येथे अष्टविनायक मित्र मंडळातर्फे ११०० किलोचा लाडू बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला. त्यानंतर या लाडवाचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले.
श्री गणेश टेकडी मंदिर हे नागपूरमधील प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने असंख्य भाविक मंदिरात येत असतात. आज गणेश जयंतीनिमित्त श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे बाप्पांच्या चरणावर तब्बल अकराशे किलोचा लाडू अर्पण करण्यात आला. त्यांनतर मंदिरात येणाऱ्या भाविकांना या लाडवाचा प्रसाद वाटण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठीं जवळपास दीड महिना कालावधी लागला असल्याची माहिती मंडळाकडून विवेक गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा :