Ashok Chavan join BJP : अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशासाठी किती शुल्क दिले? | पुढारी

Ashok Chavan join BJP : अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशासाठी किती शुल्क दिले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आज (दि.१३) त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी २१ रूपयांची देणगी पावती फाडली. तसेच त्यांनी भाजप सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही केली. Ashok Chavan join BJP

अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतपणे भाजप पक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पैसे दिले. त्यानंतर त्यांना प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्मही भरून दिला. Ashok Chavan join BJP

पक्षात कोणी पहिल्यांदा प्रवेश करते. तर त्याला पक्षाच्या सदस्यत्वाचे शुल्क द्यावे लागते. हे शुल्क २१ रुपये असते. अशोक चव्हाणांनी भाजप पक्षाचे सदस्यत्व पहिल्यांदाच स्वीकारत आहे. त्यामुळे त्यांनीही २१ रुपयांचे शुल्क भरले. त्यासाठी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे पैसे दिले. त्यानंतर त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश करुन घेण्यात आला.

Ashok Chavan join BJP : वेळ आल्यावर नक्की बोलेन : अशोक चव्हाण

दरम्यान, मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपात संधी दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार मानले. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन आणि जबाबदारी पार पाडेन, असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी आता काही बोलणार नाही, वेळ आल्यावर नक्की बोलेन. राजकारण सेवेचं माध्यम आहे. देशात राज्यात चांगले काम करायचा आहे. आजपासून सकारात्मक कामला सुरूवात होत आहे. महाराष्ट्रात भाजपा भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन आणि पार पाडेन. तसेच पक्ष आणि फडणवीसांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचेही ते म्हणाले

हेही वाचा 

Back to top button