छत्रपती संभाजीनगर : साई दर्शनासाठी जाताना भाविकांच्या कारला अपघात; ३ जण ठार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : साई दर्शनासाठी जाताना भाविकांच्या कारला अपघात; ३ जण ठार

वैजापूर ; पुढारी वृत्‍तसेवा साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार उभ्या ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात तीन साईभक्त जागीच ठार तर दोघे जखमी झाले. हा भीषण अपघात समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रा शिवारात काल (शुक्रवार) रात्री घडला. यातील मृत हे जालना तालुक्यातील रहिवासी आहेत.

या विषयी अधिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील हलके तपवन येथील ५ साईभक्त साई दर्शनासाठी शिर्डीला कार क्र. (एम.एच.२१ बी.एफ. ९२४८) ने समृद्धी महामार्गावरून जात होते. त्यावेळी धोत्रा शिवारात समृद्धी महामार्गावर चॅनेल क्र.४०५ वर हायवा ( क्र. एम एच ४६ ए.एफ.९८३३) उभा होता. भरधाव कार या हायवाला पाठीमागून जावून आदळली. या धडकेत कारमधील ३ जण जागीच ठार झाले, तर २ जण जखमी झाले.

वाहनांच्या धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यावर महामार्ग सुरक्षा पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, कोपरगाव पोलीसांनी धाव घेत दोघा जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने प्रथमोपचार करून घाटीत हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, महेश बुनगे, कमलेश आंबेकर, अमोल बोरनारे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमीत महिको कंपनीत कार्यरत रविंद्र मन्सुरराव फलके यांचा समावेश आहे. अन्य मृत व जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती.

हेही वाचा : 

Back to top button