Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून घरी बसणार नाही | पुढारी

Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून घरी बसणार नाही

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क;  मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, धमक्या आल्या म्हणून मी घरी बसणार नाही, माझी भूमिका ठाम असून ती मी बदलणार नाही असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या धमकीनंतर भुजबळांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांच्या नाशिक कार्यालयात धमकीचे बेनामी पत्र आले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे, त्या पार्श्वभूमीवर भुजबळांना पुन्हा धमकी दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना भुजबळांनी धमकीचे कारण नेमके माहिती नाही, मात्र मी माझी घेतलेली भूमिका बदलू शकत नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

भुजबळ म्हणाले, धमकीचे पत्र आले आहे, ते पोलिसांना पाठविले आहे. मॅसेज तर भरपूर आले आहेत. फोन सुद्धा आले आहेत. याधीही मला अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. मारण्याचेही प्रयत्न झाले आहेत. मात्र, आपण ते पोलिसांवर सोपवून आपली भूमिका कायम ठेवणार आहोत. कितीही धमक्या आल्या, आमलात जरी आणल्या तरी भूमिका बदलवणार नाही. काय परिणाम होतील ते होऊ देत असे भुजबळ म्हणाले.

तसेच ते पाच लोक आहेत. मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर तसेच कुठे मीटींग झाली असे सर्व खूप काही त्या धमकी पत्रात आहे असेही भुजबळांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button