सोलापूर : एमआयएमचे खा. ओवैसींना सोलापूर पोलिसांचा दणका | पुढारी

सोलापूर : एमआयएमचे खा. ओवैसींना सोलापूर पोलिसांचा दणका

“सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद ए मुस्लिमीनचे (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखविला. नंबरप्लेट नसलेली त्यांची आलिशान गाडी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवून त्यांना दोनशे रुपये दंडाची पावती दिली. ओवैसी यांनी पोलिसांचे कौतुक करीत तत्काळ दंड भरलाच सोबतच स्थानिक कार्यकर्त्यांकरवी गाडीची नंबरप्लेटही बसवून घेतली.खासदार ओवैसी हे सोलापूर दौर्‍यावर होते. त्यांची मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सभा होती. ओवेसी हे सोलापुरात आल्यानंतर सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गेले. त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ओवैसी यांच्या गाडीला नंबरप्लेट नसल्याचे पाहिले होते.

त्यानंतर ओवैसी हे हुतात्माकडे जात होते. वाहतूक पोलिसांनी शासकीय विश्रामगृहातच ओवैसी यांची गाडी अडविली. गाडीला नंबरप्लेट असल्याशिवाय सभेच्या ठिकाणी जाता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे ओवैसी यांनी पोलिसांचे कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. त्यांनी 200 रूपये दंड भरून वाद वाढवू दिला नाही

सोबतच ओवैसी यांच्या गाडीत असलेली नंबरप्लेट स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत बसवून घेतली. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी गेले. सोलापूर पोलिसांच्या या भूमिकेचे वृत्त राज्यभरात पसरले आणि सोलापूर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Back to top button