Nashik Lok Sabha Elections : शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढणार? | पुढारी

Nashik Lok Sabha Elections : शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी उमेदवारीसाठी होकार दर्शविला आहे. निवडणुकीत महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार जय बाबाजी भक्त परिवाराने सोमवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. लढायचे आणि जिंकायचे असा नारा भक्त परिवाराकडून यावेळी देण्यात आला.

नाशिकबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथूनही महाराजांच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी उमेदवारीबाबत चर्चा झाली नसल्याचा दावाही भक्त परिवाराकडून करण्यात आला. दरम्यान आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत नाशिक लोकसभेच्या निवडणूक रिंगणात शांतिगिरी महाराजांना उतरविण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button