Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २३ जानेवारी २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

मेष ः आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तू खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. काही लोक अधिक काम करण्याचे वचन देतील.

वृषभ ः आशा -आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे. सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील.

मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा.

कर्क ः जीवनसाथी- सोबत मिळून आज भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल.

सिंह ः यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे द़ृष्टिकोन विस्तारेल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल.

कन्या ः जमीन, स्थावर, जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंधात दुरावा शक्य.

तूळ ः मनावर दडपण येईल. मतभेदांमुळे नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता. कठीण काळानंतर, आजच्या दिवशी सुखद धक्का बसेल.

वृश्चिक ः तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. प्रलंबित कामे वेळ खातील.

धनु ः तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. खंबीर भूमिका साहाय्यकारी ठरेल.

मकर ः व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे.

कुंभ ः शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम भोगावे लागतील. वेळेचा सदुपयोग कराल आणि कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

मीन ः शांत राहणे चांगले असते. या वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. सर्वांची किती काळजी करता, हे दिसेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news