नागपूर : प्रफुल्ल पटेल म्हणतात भाजप मोठा पक्ष, पण भंडारा माझा गृहजिल्हा ! | पुढारी

नागपूर : प्रफुल्ल पटेल म्हणतात भाजप मोठा पक्ष, पण भंडारा माझा गृहजिल्हा !

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा महायुतीचे जागावाटप अजून ठरलेले नाही. महायुतीत साहजिकच भाजप मोठा पक्ष आहे. दुसरीकडे भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी विदर्भात सर्वाधिक बळकट आहे. माझा हा गृहजिल्हा असल्याने इच्छा असणे स्वाभाविक, पण चर्चा झाल्याशिवाय यासंदर्भात मी वरिष्ठ नेता असल्याने भाष्य करणार नाही अशी सावध भूमिका माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखविली. मिहानमध्ये आर-इंडमर या नव्या सुसज्ज एमआरओच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात या मतदारसंघात ओढाताण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ असला तरी तो सध्या भाजपच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला पुढे जात आहोत असे स्पष्ट करतानाच त्यांनी आपला लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा स्पष्ट केला.

मात्र तीन पक्ष परस्पर साथ देण्याचे ठरल्याने आपसात कार्यकर्त्यांना काम करावे लागेल, काही दिवस लागतील, चर्चा होईल तेव्हा अधिक स्पष्टपणे बोलू असेही पटेल म्हणाले. राज्यात भाजपचे 23 खासदार 105 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे वर्चस्व राहिल, मी कुठलाही आग्रह केलेला नाही, पण तो माझा गृह जिल्हा अधिकार असणे स्वाभाविक आहे. यावर पटेल यांनी भर दिला. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असून, सदैव निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत. नुकत्याच आलेल्या निर्णयावर बोलताना स्पीकर हे संवेधानिक पद, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना जबाबदारी दिली, मग त्यांच्या निर्णयावर टीकाटिप्पणी नको असेही त्यांनी कुणाचे नाव न घेता विरोधकांना खडे बोल सुनावले.

हेही वाचा :

Back to top button