Raigad | ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी

Raigad | ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी
Published on
Updated on

रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड (Raigad)  जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ७.३० च्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताम्हिणी घाटात सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स क्रंमांक MH04 FK 6299 ही पुणे येथून माणगावकडे येत होती. यादरम्यान ती रस्त्याकडेला उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोघा महिलांचा मृत्यू झाला. तसेच ५५ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना माणगावातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरु आहे.

ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. माणगाव नजीक ट्रॅव्हल्‍स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आह, तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटून हा अपघात झाला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मिणी घाटात आज (शनिवार) सकाळी भीषण अपघात झाला आहे. सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 ही पुण्यावरून माणगावकडे येत होती. इतक्यात ती रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी खासगी बसने निघाले होते. हरिहरेश्वरला शंकराचं दर्शन हे लोक घेणार होते. आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाली. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिपसरात घबराट पसरली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 55 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयायात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. आता मात्र वाहतूक सुरळीत चालू आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news