New Year Celebration : थर्टी फर्स्टला मुंबईत बिनधास्त फिरा : बेस्टच्या वतीने २५ जादा बस | पुढारी

New Year Celebration : थर्टी फर्स्टला मुंबईत बिनधास्त फिरा : बेस्टच्या वतीने २५ जादा बस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : थर्टी फर्स्टला दक्षिण मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने जादा २५ बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशीरा घराबाहेर राहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. New Year Celebration

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी फिरणाऱ्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने विविध मार्गांवर रात्री एकूण २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.  New Year Celebration

प्रवाशांच्या सोयीसाठी डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अतिरिक्त बसचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्याला, असे आवाहन बेस्टने केले आहे.

बसक्रमांकपासून बससंख्या वेळ (रात्री)

८ मर्यादित डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) शिवाजी नगर टर्मिनस २ एकमजली
६६ मर्यादित – ” – राणी लक्ष्मीबाई चौक ( सायन) ४ एकमजली
ए-११६ – ” – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ४ दुमजली
ए- ११२ – ” – अहिल्याबाई होळकर चौक ( चर्चगेट) ४ एकमजली
२०३ अंधेरी स्थानक ( प. ) जुहू बीच २ एकमजली
२३१ सांताक्रुझ स्थानक ( प. ) जुहू बस स्थानक ४ एकमजली
ए २४७ बोरीवली स्थानक ( प. ) गोराई बीच ३ एकमजली
२७२ मालाड स्थानक ( प.) मार्वे बीच २ एकमजली

हेही वाचा 

Back to top button