Flash Back : नांदेड : एका कॉलने खुनाचे गूढ उकलले; पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी | पुढारी

Flash Back : नांदेड : एका कॉलने खुनाचे गूढ उकलले; पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी

नांदेड – पुढारी वृत्तसेवा : काम फत्ते झाल्याचा निरोप काकाला दिल्याचा पोलिसांना सुगावा लागला आणि एवढ्या एकाच संशयावरुन पोलिस खुनाच्या आरोपीपर्यंत पोहोचले. ही घटना मागील वर्षी मनाठा येथे घडली होती. या आव्हानात्मक प्रकरणाचा तपास हदगावचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी केला.

संबंधित बातम्या –

ग्रामस्थ मनोहर कांबळे हे शेतात जागलीसाठी गेले होते. दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. हदगाव पोलिसांनी तपास सुरु केला. हा खुनचं असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी १०० पेक्षा अधिक संशयित तपासले. पण खुनाचा सुगावा लागत नव्हता. त्यातच पोलिसांनी मोबाईल कॉल्स तपासले, त्यात एकाने घटनेनंतर काही मिनिटातच एका व्यक्तीस फोन केला व काम झाले, असा निरोप दिला. केवळ एवढ्या क्‍लूवर पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. अटकेनंतर आरोपीने खुनाची कबुली दिली. अत्यंत क्‍लिष्ट अशा खून प्रकरणाचा उलगडा झाल्याने गावातील तणाव निवळला. पोलिसांनी या प्रकरणात कौशल्याने तपास पूर्ण केला.

Back to top button