CJI Chandrachud on Christmas 2023 : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘ख्रिसमस’निमित्त गायले ‘कॅरोल्स’, पाहा व्हिडिओ | पुढारी

CJI Chandrachud on Christmas 2023 : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 'ख्रिसमस'निमित्त गायले 'कॅरोल्स', पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘ख्रिसमस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात कॅरोल्स गायले आहे. यावेळी दोन दिवसांआधी दहशतवादांशी लढताना भारतीय लष्कराचे शहीद झालेले जवान आणि कडाक्याच्या थंडीत देखील राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी गात असल्याचे सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. (CJI Chandrachud on Christmas 2023)

दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात आज (दि.२५) ख्रिसमस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयात ख्रिसमसच्या समारंभात बोलताना CJI चंद्रचूड म्हणाले, जसे आपण ख्रिसमस साजरे करतो, त्याचप्रमाणे सीमेवर असलेल्यांना विसरू नये जे आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण गमावत आहेत. तसेच कडाक्याच्या थंडीत देखील ते आपल्या देशाच्या सीमेवर सुरक्षा करत आहेत. म्हणूनच आज आपण हा उत्सव साजरा करू शकतो. असेही चंद्रचूड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच याप्रसंगी चंद्रचूड यांनी ख्रिसमस निमित्त जगभर प्रसिद्ध असलेले “जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे” हे कॅरोलदेखील गायले. (CJI Chandrachud on Christmas Day)

‘ख्रिसमस डे’ निमित्त भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सोमवारी (दि.२५) सशस्त्र दलांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीय लष्कराच्या चार जवानांना श्रद्धांजली देखील वाहिली. (CJI Chandrachud on Christmas Day)

हेही वाचा:

Back to top button