

नाशिक : प्रवासी महिलेकडील साेन्याचांदीचे दागिने व रोकड रिक्षाचालकाने चोरल्याची घटना पेठरोडवर घडली. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम विक्रम जखवाडे (रा. नाशिकराेड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी (दि.१८) रात्री नऊ वाजता रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यावेळी रिक्षाचालकाने १ लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली. पंचवटी पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
रोहित्रातून ऑइल लंपास
नाशिक : महावितरण कंपनीच्या रोहित्रातून चोरट्याने१७ हजार रुपयांचे ऑइल व तांब्याच्या वाईंडींग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. योगेश बाबुराव बर्वे (रा. आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२०) मध्यरात्री दीड वाजता हनुमानवाडी येथील रोहित्रातून ऑइल व इतर किंमती ऐवज लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून पोलिस तपास करीत आहेत.
प्राणघातक हल्ला करून लुटमार
नाशिक : युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील चार हजार रुपये हिसकावून तिघांनी पळ काढल्याची घटना पंचवटी भाजी मार्केट यार्ड परिसरात घडली. याप्रकरणी मोहमंद आदाब हसुेन जाफरी (२६, रा. पंचवटी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्याच तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. जाफरी यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.१९) रात्री २२.४५ वाजता दिंडोरी रोडवरील मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली. संशयित गोपाल गोरे, जना काकड व आणखी एकाने जाफरी यांच्याकडे पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी जाफरीवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रोकड हिसकावून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
घरातून मोबाइल लंपास
नाशिक : घरात शिरून चोरट्याने २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना जुना गंगापूर नाका परिसरात घडली. रमेश सुखदेव भणगे (२५) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.२०) सकाळी नऊ वाजता चोरट्याने घरातून दोन मोबाइल चोरले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद नगरला घरफोडी
नाशिक : नाशिकरोड येथील आनंदनगर परिसरातील जगताप मळा येथे चोरट्याने २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान घरफोडी करून ६७ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. धन्नालाल नारायणदास सुर्यवंशी (७४) यांच्या फिर्यादीनुसार, उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :