पैठण : जमिनीच्या वादातून गेवराई बाशी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

शेषराव सोमाजी खुटेकर
शेषराव सोमाजी खुटेकर

पैठण : पुढारी वृत्तसेवा; पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथील एका ७० वर्षीय शेतकऱ्याने शेतीच्या वादातून गळफास घेतला. ही घटना बुधवारी दि. ३१ रोजी सकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये एमआयडीसी पोलीस  आणि तहसील कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथील शेतकरी शेषराव सोमाजी खुटेकर (वय ७०) यांच्या भाऊकीमध्ये शेती संदर्भात वाद सुरू होता. या वादातून संबंधित तहसील विभाग व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जबाबदार अधिकारी योग्य न्याय करत नव्हते. त्यांच्या त्रासामुळे बुधवारी रोजी सकाळी या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास घेतला.

या प्रकारची माहिती मिळताच पैठण विभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ भाव घेतली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी मयत खुटेकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये स्थानिक पोलीस व तहसील कर्मचाऱ्यांसह अनेक जणांचे नाव यात नमूद असल्याचे माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली. पोलीस पंचनामा व तपासानंतरच खरे प्रकरण काय आहे हे समोर येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news