मांडवगण फराटा या ठिकाणी मध्य रात्री १३ दुकाने चोरटयांनी फोडली | पुढारी

मांडवगण फराटा या ठिकाणी मध्य रात्री १३ दुकाने चोरटयांनी फोडली

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांकडून १३ दुकानांची तोडफोड करण्यात आली आली. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा हे पूर्व भागातील मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. त्यामुळे या गावात बाजारपेठ मोठी आहे. मांडवगण फराटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील मुख्य भागातील कापड दुकान, फोटो स्टुडिओ, सिद्धी इंटरप्राईजेस, मेडिकल, स्वीट होम, इलेक्ट्रिक, अशा सुमारे १२ ते १३ दुकाने फोडली आहे. मुख्य रस्त्यालगत असलेली १३ दुकाने फोडले गेल्यामुळे इतर व्यावसायिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडवगण फराटा हे गाव मोठे असल्याने या भागात पोलिस चौकी देखील काही अंतरावर आहे. यापूर्वी देखील मुख्य चौकात एटीएम फोडीचा प्रकार घडला होता. तसेच अधूनमधून किरकोळ चोऱ्या होत असतात; मात्र एका रात्रीत मुख्य भागात १३ दुकाने फोडली.

याबाबत बोलताना सरपंच शिवाजी कदम यांनी सांगितले की, मांडवगण फराटा येथे चोरीत मुख्य भागातील दुकानांची तोडफोड झाली असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस चौकी जवळ असून अनेकदा कामानिमित्त अंमलदार बाहेर गेलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसतात. बऱ्याचदा पोलिस चौकी देखील बंद असते. त्यामुळे आगामी काळात येथे पोलिस अंमलदार कायमस्वरूपी उपलब्ध असायला हवेत असे ते म्हणाले.

 फोडण्यात आलेली दुकाने

गार्गी कापड दुकान, काळे टायर्स (कदम आण्णा कॉन्प्लेक्स), अभि गायकवाड फोटोग्राफी, जीवन जगताप ट्रांसपोर्ट, दरेकर डेअरी, डॉ. सुनिल पवार मेडिकल, महादेव स्वीट होम, जयभवानी स्वीट होम, भोंगळे फोटोग्राफी, बालाजी फुटवेअर, बालाजी कापड दुकान, दरेकर कृषि सेवा केंद्र आणि महेश दरेकर यांचे महा ई सेवा केंद्र.

Back to top button