सिंधुदुर्ग : राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी राज्‍यभरातील नागरिकांची गर्दी

शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी
शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी

मालवण : पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मेढा राजकोट येथे नौदलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण नौदल दिना दिवशी (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याच्या दुसऱ्या दिवशीपासून शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी राज्यभरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी गर्दी होत आहे.

नौदल दिनाच्या निमित्ताने मेढा राजकोट येथे शिवपुतळ्याची मुहूर्तमेढ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने शिवपुतळ्याची महती संपूर्ण देशात पसरली, अन् मेढा राजकोट परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले. सोमवारी पंतप्रधान येऊन जाताच दुसऱ्यादिवशी राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत.

गेली अनेक वर्षे हा परिसर निर्जन स्थळ म्हणून परिचित होता. मात्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होताच या राजकोट परिसराला पर्यटन नगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना हॉटेल किंवा अन्य माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल यात शंका नाही. मंगळवारी सायंकाळी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. शिवाय स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी गर्दी केल्‍याचे दिसून आले.

नेव्हीच्या सैनिकांकडून मोदींना मानवंदना

मेढा राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच नेव्हीच्या सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली. हा परिसर जणू रेडकार्पेट बनला होता. या नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण जगभरातील जनतेने पाहिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news