डॉ. बबनराव तायवाडेंना धमकी; नागपूर पोलिसांकडून सुरक्षा | पुढारी

डॉ. बबनराव तायवाडेंना धमकी; नागपूर पोलिसांकडून सुरक्षा

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांना घमकी आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्‍यांना सुरक्षा दिली आहे. तायवाडेंच्या सुरक्षेसाठी एक गनमॅन सतत तैनात असणार आहे. मला जन्मठेप, फाशीची शिक्षा झाली तरी ओबीसींच्या हक्कासाठी मी सतत बोलणार, लढत राहणार, कुणालाही घाबरत नाही असे डॉ. तायवाडे यांनी ‘पुढारी’ शी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, बबनराव तायवाडेंवर हिंगोलीत अलिकडेच गुन्हा दाखल झाला आहे. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी २६ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील जाहीर सभेत बोलताना तायवाडे यांनी ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा, असे वक्तव्य केले होते. त्यांनतर मराठा समाजाच्या वतीने तक्रार देण्यात आली होती. यानुसार बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button