Accident News : कुरकुंभ घाटात कारवर कंटेनर पलटी ; कारचा चुरा | पुढारी

Accident News : कुरकुंभ घाटात कारवर कंटेनर पलटी ; कारचा चुरा

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ (ता. दौंड) येथील घाटात कंटेनर एका कारवर (चारचाकी) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून चारजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दौंड तालुक्यातून बेळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग गेला असून वरील टप्प्यात कुरकुंभ ते दौंड हा रस्ता वाहतुकीस अरूंद ठरत आहे. परिणामी वारंवार अपघात घडत असून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.

बुधवारी (दि. २९) दुपारी घाटातून कंटेनर दौंडहून कुरकुंभकडे निघाला होता. याच वेळी कुरकुंभहून दौंडकडे एक कार निघाली होती. कंटेनर थेट कारवर पलटी झाला. यामध्ये कार पूर्णपणे चेपली. कारची अवस्था पाहता जीवितहानी झाली असेल अशी स्थिती आहे; मात्र सुदैवाने कारमधील तिघे व कंटेनर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना दौंड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कुरकुंभ-दौंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा :

Back to top button