ऐन दिवाळीत इंद्रायणी नदी प्रदूषित ! | पुढारी

ऐन दिवाळीत इंद्रायणी नदी प्रदूषित !

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथील इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठी असणारे काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी तसेच नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते. शुक्रवारी (दि.10) रात्री इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणामुळे फेसाळली. रसायनयुक्त फेस मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्यावर दिसत होता.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने भाविकांना इंद्रायणी स्नान अवघड झाले आहे.एकीकडे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.तर दुसरीकडे इंद्रायणी प्रदूषणात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button