मुंबई : दादरमधील कोहिनूर बिल्‍डिंगच्या पार्किंगला आग; ६ वाहने जळून खाक | पुढारी

मुंबई : दादरमधील कोहिनूर बिल्‍डिंगच्या पार्किंगला आग; ६ वाहने जळून खाक

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा दादरच्या जे के सावंत मार्गावरील कोहिनूर प्लाझा मधील मुंबई महानगर पालिकेच्या चौथ्या मजल्यावरील पार्किंग स्थळाला आज (मंगळवार) मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये १६ वाहन जळल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आलिशान वाहनांसह इमारतीच्या चौथ्या मजल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई महापालिकेच्या दादर जी-उत्तर प्रभाग कार्यालयाजवळ, हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर पश्चिम येथील कोहिनूर पार्किंगच्या चौथ्या मधल्या वरील पार्किंगमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग रात्री अडीच वाजता आटोक्यात आली असली तरी सुमारे पाच गाड्या या आगीत जळून खाक झाल्या. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोहिनूर पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला साडेबाराच्या सुमारास मिळतात अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यानंतर अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मध्यरात्री 2.25 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. दरम्यान ही आग गाड्यांमधील शॉर्टसर्किटमध्ये लागली की, विजेच्या शॉर्टसर्किटमध्ये लागली. याचा तपास अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button