आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही : मनोज जरांगे | पुढारी

आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही : मनोज जरांगे

जालना; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमचा लढा सुरू आहे. तथापि, आम्ही यादरम्यान कधीच ओबीसींना टार्गेट केलेले नाही, असा पलटवार मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्या वक्तव्यावर केला आहे. लाठीचार्जसंदर्भाच उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ते म्हणाले, आम्ही कुठेच, कोणावर अतिक्रमण केले नाही. आम्हाला आरक्षण मिळाले, तरीही ते आमच्या हक्काचे आहे. आता यापुढे कोण, काय बोलणार, काय टीका करणार, याकडे लक्ष द्यायचे नाही, असे मराठा समाजाने ठरवले आहे.
भुजबळ यांच्या वक्तव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यावर बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, वडेट्टीवार सर्वांनाच पाठिंबा देतात. आम्हालाही त्यांचा पाठिंबा आहे. ओबीसी बांधवांच्या व्यथा आम्ही जाणून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनीदेखील आमच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका ओबीसी बांधवांची असल्याचे मला गावोगावी दिसून आले आहे. त्यामुळे कोणी जर पातळी सोडून बोलणार असतील, तर त्याला आमचा नाईलाज आहे.

Back to top button