अलीबाग : ‘दृश्यम’ची आयडिया घेऊन २ बहिणींचा खून; सर्च हिस्ट्रीमुळे पोहोचला तुरुंगात | Murder of 2 sisters Alibaug | पुढारी

अलीबाग : 'दृश्यम'ची आयडिया घेऊन २ बहिणींचा खून; सर्च हिस्ट्रीमुळे पोहोचला तुरुंगात | Murder of 2 sisters Alibaug

Murder of 2 sisters Alibaug : नियोजनपूर्वक खून पण पोलिसांनी दाखवली सूचकता

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिबागमध्ये भावानेच दोन सख्या बहिणींना सूपमधून विष पाजून खून करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पोलिस तपासात या प्रकरणातील आरोपी असलेल्या गणेश मोहिते यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि दृश्यम या हिंदी सिनेमातून आयडिया घेत हे खून केल्याचे उघकीस आले आहे. (Murder of 2 sisters Alibaug)

या घटनेतील दोन्ही बहिणी अविवाहीत होत्या. हा खून झाल्यानंतर गणेश याने वारंवार खुनामागे अन्य नातेवाईकांचा हात असल्याचे पटवून दिले होते, त्यामुळे आईनेही नातेवाईकाविरोधात जबाब नोंदवला होता. ही आयडिया गणेशने दृश्यम सिनेमातून उचलली होती.
आरोपी मोहिते हा पालघरमध्ये वनखात्यात क्लर्क आहे. बहिणी स्नेहा (३०) आणि सोनाली (३४) यांचा खून जर पालघरमध्ये केला तर संशय आपल्यावर येईल, याची त्याला कल्पना होती. त्यामुळे त्याने हा खून रेवदांडा येथे त्यांच्या राहात्या घरी घडवून आणला. ही बातमी The First Post या वेबसाईटने दिली आहे.

मोहिते याने घरी सूप बनवला होता आणि त्यात उंदीर मारण्याचे विष मिसळले होते. सूप पिऊन झाल्यानंतर मोहितेने आईला पाणी आणण्यासाठी सांगितले. हे पाणी व्हरांड्यात ठेवण्यात आले होते. पाणी पिऊन मोहिते गरबा खेळण्यासाठी जातो असे सांगून निघून गेला. विशेष म्हणजे यापूर्वी मोहिते गरबा खेळण्यासाठी कधीच गेला नव्हता. Murder of 2 sisters Alibaug

आईचे केले होते ब्रेनवॉश Murder of 2 sisters Alibaug

सूप प्याल्यानंतर सोनालीची तब्येत बिघडली आणि तिने भावाला फोन करून बोलवले. पण मोहिते जाणीवपूर्वक घरी उशिरा आला. सोनालीचा १७ ऑक्टोबरला उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर स्नेहावर उपचार सुरू होते. स्नेहाचा मृत्यू २० ऑक्टोबरला झाला. स्नेहा शुक्रवारपर्यंत उपचार घेत होती. मोहिते याने स्नेहा आणि त्याच्या आईला व्हरांड्यात ठेवण्यात आलेल्या पाण्यात विष होते हे वारंवार सांगितले. दृश्यम चित्रपटाप्रमाणे ही एकच गोष्ट तो स्नेहा आणि आईला वारंवार सांगत होता. त्यामुळे स्नेहाने मृत्यूपूर्वी आणि आईनेही नातेवाईकांनी पाण्यात विष मिसळले असा जबाब पोलिसांना दिला. संबंधित नातेवाईकांचे स्नेहा आणि सोनालीसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते.

असा लागला तपास

हा तपास नंतर लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. यात ज्या नातेवाईकांचे नाव गोवण्यात आले होते, त्यांच्या व्हरांड्यात CCTV आहे, त्यातील फुटेज नुसार पाण्यात कोणाही विष मिसळल्याचे दिसले नाही. तसेच आईनेही हेच पाणी प्याले होते, पण त्यांना कसलाही त्रास झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांना जबाबात आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यात विसंगती आहे, असे लक्षात आले. पोलिसांनी खोलात तपास केला असता मोहिते आणि दोन्ही बहिणीत सतत भांडण होत असल्याचे लक्षात आले.

सर्च हिस्ट्रीमुळे पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी मोहितेचा फोन ताब्यात घेतला आणि तपास केला असता, त्यात Poisoning शी संबंधित ५६ सर्च दिसून आले. गोड विष, कमी गोड विष, विष घेतल्यानंतर माणूस किती वेळात मरतो, अशा प्रकारचे सर्च त्याने केले होते. पोलिसांना नंतर उंदीर मारण्याच्या विषाचे एक माहितीपत्रक त्याच्या कारमध्ये मिळाले. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मोहिते हाच खुनाचा सूत्रधार असल्याची खातरजमा केली आणि त्याला २५ ऑक्टोबरला अटक केली.

भांडणाचे कारण

मोहितेच्या वडिलांचे निधन २००९ला झाले. ते वनखात्यात कर्मचारी होते. अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागे नोकरी कुणी घ्यायची यावरून भावंडात मोठा वाद झाला होता. पण नोकरी लागली तर बहिणींची काळजी घेतो, असे आश्वासन देऊन गणेश मोहिते याने ही नोकरी मिळवली. यांचे घर रायगडमधील रेवदांडा येथे आहे. वडिलांची प्रॉपर्टी त्याने परस्पर स्वतःच्या नावावर केली होती. या कामी त्याला एका नातेवाईकाने मदत केली होती. यातून नातेवाईक आणि बहिणींत मोठा वादही झाला होता. बहिणी लग्न करत नव्हत्या आणि गणेश मोहिते त्यांना सांभाळण्याच्या मानसिकतेत नव्हता. तसेच त्याला वडिलांच्या मालमत्तेत बहिणींना वाटाही द्यायचा नव्हता, त्यातून त्याने दोन्ही बहिणींचे खून केले.

हेही वाचा

Back to top button