कोल्हापुरात वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून

दगडाने ठेचून खून
दगडाने ठेचून खून
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर येथील जवाहर नगर सरनाईक वसाहत परिसरात (70 वर्षीय) वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून करण्यात आला. ही घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली. (लक्ष्मी विलास क्षीरसागर वय 70 राहणार रोहिदास कॉलनी, कोल्हापूर) असे त्‍यांचे नाव आहे.

नवरात्र उत्सव काळात शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात खुनाचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली आहे. अद्याप मारेकरांचा शोध लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news