

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथ् साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
यांसारखे देवीचे माहत्म्य सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्त्र नामस्मरण करणे, आणि प्रत्येक नामःस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते. (Kumkumarchana Vidhi)
कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची श्रमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीतत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते. Kumkumarchana Vidhi
कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगूण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतिक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बिजाला गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले आहे.
ललितसहस्त्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्र नामावली, देवी अष्टओतर शत नामावलींचे उच्चारण करत असताना कुंकू वाहणे याला कुंकूमार्चन म्हणतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी, पुण्यकारक मानले जाते.
कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा 'श्री'यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन सुचिर्भुत करून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतण्या हाताने कुंकू अर्पण करावे. याच बोटांनी कुंकूम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकूमार्चन जरूर केले जाते. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे मानतात.
कूंकुमार्चन करुन अर्पण केलेले कुंकूम एका डबीत ठेवले जाते. अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते. कुंकुमार्चनाचे कुंकू आप्तेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते. काही महिला हे कुंकू सिंधूर म्हणूनही वापरतात. हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशाप्रकारे कुंकुमार्चन करत असे. गेल्या काही वर्षांत सामूहिक कुंकुमार्चनाचे सोहाळेही मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात.
ताह्मणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी. पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे. देवीचे आवाहन करून पूजन सूरू करावे. लाल रंगाचे फूल वहावे. धूपदिप लावावा. देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे. कुंकू वाहुन झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे. आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे.
हेही वाचा