Navratri 2023 : यंदाचा नवरात्रौत्सव १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान; जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त

Navratri 2023
Navratri 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या नवरात्र उत्सवास १५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. त्या दिवशी चित्रा नक्षत्र , वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. १९ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. २२ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा असून २३ ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) आहे. शिवाय, २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असणार आहे. (Navratri 2023)

सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात. मात्र, या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो, पण या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा १० व्या दिवशी आहे. अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही. त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) १७ ऑक्टोबर, १९ ऑक्टोबर, २१ ऑक्टोबर किंवा २२ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी २२ ऑक्टोबर रोजी आहे. (Navratri 2023)

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २४ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे. काही लोकांकडून वेगवेगळ्या समाज माध्यमांवर सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम निर्माण करणारे मेसेज हेतु पुरस्सर पाठविले जातात. त्याकडे दुर्लक्ष करावे व दसरा २४ ऑक्टोबर रोजीच साजरा करावा, अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे. (Navratri 2023)

नवरात्रातील महत्वाचे दिवस – (Navratri 2023)

१५ ऑक्टोबर – घटस्थापना
१९ऑक्टोबर – ललिता पंचमी
२१ ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
२२ ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
२३ ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना
२४ ऑक्टोबर – विजया दशमी (दसरा) (Navratri 2023)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news