Anna Hazare vs Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात अण्णा हजारे अब्रुनुकसानीचा दावा करणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर समाजसेवक अण्णा हजारे मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत, अण्णा हजारे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटलं होतं. यावर आता अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hazare vs Jitendra Awhad )
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही : आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर आपल्या 'X' खात्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, "ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.
Anna Hazare vs Jitendra Awhad : खटला दाखल करणार : अण्णा हजारे
आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलत असताना आव्हाडांना प्रतित्यूतर दिले आहे. ते म्हणाले की,"माझ्यामुळे देशाचे नुकसान झाले असेल तर त्यांच्यामुळे अनेकांना फायदाही झाला आहे. खोटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, यासोबतच मी त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार आहे.
पुढे बोलत असताना ते म्हणाले की,"माझ्यामुळे देशाचे नुकसान झाले असेल, तर माझ्यामुळे देशात असे अनेक कायदेही झाले आहेत, ज्याचा फायदा जनतेला झाला आहे. माझ्या अनेक आंदोलनांमुळे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचे नुकसान झाले आहे. माझ्यामुळे त्यांच्या अनेकांना घरी बसावे लागले आहे.माझ्यामुळेच त्यांचे हे नुकसान झाले आहे आणि कदाचित ते हे सहन होत नाही. मात्र, काही लोकांचे काम हे आहे त्यांना माझ्यावर खोटे आरोप करू द्या. माझी बदनामी करा पण मला काही फरक पडत नाही."
हेही वाचा
- नागपूर : खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात डॉक्टर संघटनेचे आंदोलन
- चित्रकलेच्या एलिमेंटरी परीक्षेतील संकल्प चित्र प्रश्नपत्रिकेत गोंधळ; कलाध्यापक संघ महामंडळाकडून चौकशीची मागणी

