

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सुमारे ४ कोटी कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) घरे मिळाली आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी दिली. दिल्लीत 'टाइम्स नाऊ अमेझिंग इंडियन्स' पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (PM Awas Yojana)
ते पुढे म्हणाले, "४ कोटी म्हणजेच भारतातील १५ टक्के कुटुंबांना पीएम आवास योजनेंतर्गत शहरे आणि गावांमध्ये घरे मिळाली आहेत."
संबंधित बातम्या
सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना पक्क्या स्वरुपाची घरे देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक कुटुंबांना चांगली व पक्क्या स्वरुपाची घरे मिळाली आहेत. यामुळे अनेक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. (PM Awas Yojana)
गरीब लोकांना पक्की घरे मिळावीत तसेच महिलांचे सबलीकरण व्हावे, या हेतुने केंद्र सरकारकडून पीएम आवास योजना राबविली जाते. देशातील प्रत्येक गरिबाला पक्के घर देण्याचा सरकारचा निर्धार आहे.
केंद्र सरकारने पीएम आवास योजनेच्या खर्चात ६६ टक्क्यांनी वाढ करुन या आर्थिक वर्षासाठी ७९,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती.
हे ही वाचा :