नाशिक : येवल्यात शरद पवार गटाकडून शासकीय आदेशाची होळी

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीमध्ये खासगी कंपन्यांना कंत्राट देऊन सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करत असल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला शहर व तालुका यांच्या वतीने विंचूर चौफुली येथे या शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.
संबधित बातमी :
- नगरवर यंदाही दुष्काळछाया !! बारा वर्षांत पाच वेळा टंचाईच्या झळा
- Goa News | भजन स्पर्धेत केरी सत्तरीचे श्री आजोबा कल्चरल असोसिएशनचे भजन पथक प्रथम
- नाशिक क्राईम : सराईत गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निदर्शनास सुरुवात झाली. विंचूर चौफुली येथे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आदेशांची होळी केली. दोन चार लोकांच्या खासगी कंपन्यांना लाभ देण्यासाठी शासकीय खर्च बचतीच्या नावाखाली शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये. शासन हे खाजगी कंपन्यांच्या नफ्यासाठी नसावे तर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आधारलेले असावे, त्यामुळे शासनाने हा जीआर त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट चे प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी चे शहरअध्यक्ष योगेश सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे एजाज शेख, शंभू शिंदे, नारायण गायकवाड,साईनाथ मढवई, राहुल शिंदे, मिलिंद पाटील, अकबर शहा, कालू शेख, निलेश भदाणे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा :