हिंगोली – मराठा बांधव ट्रॅक्टर रॅलीद्वारे तहसील कार्यालयावर धडकले | पुढारी

हिंगोली - मराठा बांधव ट्रॅक्टर रॅलीद्वारे तहसील कार्यालयावर धडकले

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा – मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे, जालना लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे, अशा घोषणा देत कलमनुरी फुटाणा येथील सकल मराठा समाजातील नागरिक ट्रॅक्टर द्वारे तहसील कार्यालयावर धडकले.

कळमनुरी तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील तसेच कुरुंदा येथील सकल मराठा समाजातील गावकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. कळमनुरी तालुक्यातील बाभळी साळवा येथील गावकऱ्यांनी कळमनुरी तहसील कार्यालयावर पदयात्रा काढली.

त्यानंतर आज फुटाणा येथील मराठा समाज बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढली मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासह इतर घोषणा देत गावकरी ट्रॅक्टरद्वारे तसेच दुचाकी वाहनाद्वारे तहसील कार्यालयावर धडकले. यावेळी प्रशासनाकडे मागण्यांची निवेदन सादर करण्यात आले.

Back to top button