विजय सेतूपती याच्यावर एकाने अचानक मागून हल्ला केला; व्हिडिओ व्हायरल

विजय सेतूपती याच्यावर एकाने अचानक मागून हल्ला केला; व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक विजय सेतूपती याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूर विमानतळावर एका व्यक्तीने विजय सेतूपतीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्याच्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

विजयवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जर्नादन कौशिक या युजर्सने ट्विट केला आहे. तो त्याच्या टीमसोबत चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी पाठिमागून एकाने हल्ला केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर विजय सेतूपती यांना धक्का बसला आहे. विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या हल्ल्यानंतर कारवाई केली आहे.

एका वृत्तानंतर, विजय सेतूपतीवर हल्ला करणारा व्यक्ती मल्ल्याळम असून सेतूपतीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्याने त्याने हल्ला केला. या घटनेची अधिक चौकशी सुरु आहे.

विजय सेतूपती एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळूरला आले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. विजय शेवटचा 'एनाबेले सेतूपती' आणि 'मास्टर'मध्ये दिसला होता. विजय सेतूपती याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या भूमिकांपासून केली, पण 2009 मध्ये आलेल्या 'व्हॅनिला कबड्डी कुझू' या चित्रपटाने त्याला मोठा स्टार बनवले. या चित्रपटानंतर त्याचा आलेख चढता राहिला.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news