Bray Wyatt Death : माजी WWE चॅम्पियन ‘ब्रे व्याट’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bray Wyatt Death : माजी WWE चॅम्पियन ‘ब्रे व्याट’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) स्टार ब्रे व्याट यांचे गुरुवारी (दि.२४) निधन झाले. ट्रिपल एचने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. टीएमझेडच्या मते, व्याट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. ब्रे व्याट हा WWE मधील महत्त्वाच्या कुस्तीपटूंपैकी एक होता. अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात त्यांचा जन्म झाला.  (Bray Wyatt Death)

पॉल लेवेस्क यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "आत्ताच WWE हॉल ऑफ फेमर माईक रोटुंडाचा कॉल आला ज्याने आम्हाला दुःखद बातमी कळवली की, आमचे WWE कुटुंबातील सदस्य, विंडहॅम रोटुंडा, ज्याला ब्रे म्हणूनही ओळखले जाते. व्याट, आज अनपेक्षितपणे निघून गेला. आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत. आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा. माहितीनुसार, ब्रे व्याट यांचे खरे नाव विंडहॅम रोटुंडा होते, ते गेल्या अनेक महिन्यांपासून डब्ल्यूडब्ल्यूईपासून अलिप्त होते. २००९ पासून WWE सोबत होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news