IND vs IRE 1st T20 : बुमराहचा दमदार कमबॅक; डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय | पुढारी

IND vs IRE 1st T20 : बुमराहचा दमदार कमबॅक; डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि आयर्लंड यांच्यामधील तीन सामन्यांच्या T20 मालिकेला आज (दि.१८) सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडवर २ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आयर्लंडने सात विकेट गमावत १३९धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६.५ षटकांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला. (IND vs IRE 1st T20)

डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने आयर्लंडचा दोन धावांनी पराभव केला. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ७ विकेट गमावत १३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६.५ षटकांत २ विकेट गमवात ४७ धावा केल्या. त्यानंतर पाऊस पडू लागल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाने हा सामना दोन धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद ५१ धावा केल्या. कर्टिस कॅम्फरने ३९ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय केवळ पॉल स्टर्लिंग आणि मार्क अॅडायर यांना दोनअंकी धावसंख्या गाठता आली. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीपला एक विकेट मिळाली. मात्र, अर्शदीप त्याच्या अखेरच्या षटकात चांगलाच महागात पडला. भारताकडून यशस्वीने २४ आणि ऋतुराजने १९ धावा केल्या. टिलक वर्माला भोपळाही फोडता आला नाही. संजू सॅमसन एक धाव घेत नाबाद राहिला. मालिकेतील पुढील सामना रविवारी होणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button