lightning strike : वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू, चार जखमी | पुढारी

lightning strike : वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू, चार जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेश राज्यात छतरपूर जिल्ह्यातील कछार गावात वीज कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाले आहेत. याबबत पोलिसांनी शनिवारी (दि.२२) दिलेल्या माहितीनुसार जखमींना दमोह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (lightning strike)

lightning strike : दोघांचा मृत्यू, चार जखमी

माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील छतरपूरमधील कररी आणि कछार गावादरम्यान, वनविभागाच्या वृक्षारोपणात तारांचे कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काम करणारे मजूर पावसापासून बचाव करण्यासाठी जवळच्या झाडाखाली लपून बसले होते. दरम्यान, वीज पडली आणि त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना दमोह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ८ जुलै रोजी, उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. यापूर्वी ४ जुलै रोजी राज्यातील आझमगड जिल्ह्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला होता तर एक बालक जखमी झाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमगड आणि गाझीपूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा 

Back to top button