हद्द झाली राव! बापाला एकटं वाटू नये म्हणून मुलीनींच लावून दिलं पाचवं लग्न, पाकिस्तानमधील प्रकार

5th marriage
5th marriage

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलींनीच लावून दिलं आपल्या वडिलांचं पाचवं लग्न ! (5th marriage) हे वाचून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं का? तर तुम्ही जे वाचताय ती घटना घडली आहे पाकिस्तानमध्ये. आणखी एक आश्चर्यकारक घटना म्हणजे. ते लग्न त्यांच्या मुलींनच लावून दिलं आहे.  एका ५६ वर्षीय असलेल्या बापाला आयुष्यात एकटेपणा वाटू नये म्हणून मुलींनीच पाचवं लग्न लावून दिलं आहे.  वाचा सविस्तर काय आहे नेमकी घटना….

१० मुली, 1 मुलगा, 40 नातवंडे 

एका  ५६ वर्षीय व्यक्तीने पाचवं लग्न केलं आहे. आणि ते लग्न त्याच्या मुलींनीच लावून दिलं आहे. ही घटना घडली आहे पाकिस्तानमध्ये. आणि ही घटना सर्वांच्या समोर आली ती एका युट्युबरमुळे. त्याचं नाव आहे यासिर शामी.

पाचव्यांदा लग्न केलेल्या व्यक्तीचं नाव आहे शौकत. शौकत यांना पहिल्या पत्नींपासून १० मुली आणि एक मुलगा आहे. तर चाळीस नातवंडे आहेत. यासिर शामीने सांगितले की, जेव्हा त्यांच्या पत्नींंचा मृत्यू झाला आणि त्यांच्या आठव्या मुलीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा. तिने आपल्या वडिलांच्याही लग्नाचाही विचार केला. कारण आपल्या वडिलांना आपल्या जाण्यानंतर एकाकी वाटू नय. अखेर त्यांच्या आठव्या मुलीने त्यांच्यासाठी एक त्यांना हवी तशी जोडीदार शोधला आणि लग्न लावून  दिले. आता या दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे.

शौकत यांना लग्नाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, वयापेक्षा तुम्ही मनाने, ह्रदयाने तरुण असायला हवे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news