पाचवी-आठवीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार

पाचवी-आठवीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी-आठवी परीक्षांचा निकाल गुरुवारी (दि. 24) दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेमार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत पाचवी आणि आठवीमध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन 20 जून ते 30 जून, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

त्या मूल्यमापनाचा ऑनलाइन निकाल www. msbos. mh- ssc. ac. in या संकेतस्थळावर गुरुवार (दि.24) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्याला संबंधित माहितीची प्रत घेता येईल. मात्र, विद्यार्थ्यांना पाचवी-आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news