Devendra Fadnvis : “मी कधीच विसरत नाही…” देवेंद्र फडणवीसांनी दिले पवार, ठाकरेंना उत्तर (व्हिडिओ)

Devendra Fadnvis : “मी कधीच विसरत नाही…” देवेंद्र फडणवीसांनी दिले पवार, ठाकरेंना उत्तर (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्‍या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्‍यांनी रविवारी (दि. २) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Ajit pawar latest )घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मुलाखतीमधील शॉर्ट व्हिडिओ "मैं भूलता नहीं हूँ…" असं कॅप्शन देत शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाणून घ्या काय आहे या व्हिडिओमध्ये. (Devendra Fadnvis insta post)

राजकारणात टिकण्यासाठी रणनीती महत्त्वाची

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना  उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला हाेता. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव यांनी केल्याचे ते म्हणाले हाेते. रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, फसवणूक करणाऱ्यांना मी कधीच विसरत नाही. मी विचारधारेशी तडजोड करत नाही, हे आमचे धोरण नाही; पण राजकारणात टिकण्यासाठी रणनीती महत्त्वाची आहे.

Devendra Fadnvis insta post : काय आहे 'या' व्हिडिओमध्ये 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले हाेते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या शुभेच्छांची इन्स्टा पोस्ट शेअर केली. त्यानंतर फडणवीस यांनी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे. हा शॉर्ट व्हिडिओ रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीमधील आहे.

या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी म्‍हटले हाेते की, "महाराष्ट्रात राजकारणात सत्ताधारी आणि विराेधकांमध्‍ये संवाद राहिला आहे. फक्त उद्धव ठाकरे यांनी  ती पंरपरा मोडली आहे. आजवर सर्व पक्षांमध्ये संवाद होत आला आहे.  महाराष्ट्रात आम्ही दुश्मन नाही आहोत. आम्ही राजकीय विरोधक आहोत. त्यानंतर फडणवीस म्हणतात "चीजे मैं कभी भुलता नही, अगर मैं भुलता तो  ये सरकार नही बनती".

त्याचबरोबर या  शॉर्ट व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे हे २०१९ मध्ये  महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते शपथविधी करतानाचे काही क्षण, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते शरद पवार, उध्दव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण त्याचबरोबर  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युतीनंतरचे यांचे काही क्षण दाखवले आहेत.

परत येईन! हा व्हिडिओ व्हायरल झाला होता

भाजप आणि उद्धव वेगळे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले आणि हे सरकार तीन दिवसांनी पडले. यानंतर फडणवीस यांनी एका कवितेतून आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी ते महाराष्ट्र विधानसभेत म्हणाले होते, "माझे पाणी कमी होत असल्याचे पाहून माझ्या किनाऱ्यावर घर बांधू नका, मी सागर आहे आणि परत येईन!" हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या आता "मैं भूलता नहीं हूँ…: व्हिडिओ  इन्स्टा पोस्टवर सोशल मीडिया युजर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असुन. ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया असेल याकडे लक्ष लागुन राहीले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news