Fasting Samosas : उपवासाचे समोसे कसे कराल? 

Fasting Samosas : उपवासाचे समोसे कसे कराल? 
Fasting Samosas : उपवासाचे समोसे कसे कराल? 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाची नवरात्री मोठ्या उत्साहात देशभर साजरी केली जात आहे. कोणताही सण असो… त्या सणाला कोणते पदार्थ खातात, याला खूपच महत्व असतं. नवरात्रीच्या उत्सवात भक्त उपवास धरतात, त्यामुळे उपवासाच्या पदार्थांचा चांगलीच मागणी असते. तर घर बसल्या उपवासाचे समोसे (Fasting Samosas) कसे करायचे, हे आज आपण पाहू…

साहित्य 

१) एक वाटी उपवासाचे भाजणी पीठ

२) शेंगदाण्याचे कूट

३) ओले खोबरे

४) उकडलेले बटाटे

५) उकडलेले रताळे आणि कच्ची केळी

६) चार-पाच हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ

७) तूप, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आले

८) एक-एक चमचा साबुदाणा पीठ आणि राजगिरा पीठ

कृती 

१) पहिल्यांदा उपवासाच्या भाजणीच्या पीठात एक चमचा साबुदाणा पीठ आणि एक चमचा राजगिरा पीठ घ्या.

२) त्यात तूप घालून ते सर्व घट्ट मळून घ्या. काही वेळासाठी भिजवत ठेवा.

३)  तोपर्यंत मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यावर जिरे, कढीपत्ता, आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट परतवून घ्या.

४) त्यानंतर त्यात उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे, कच्ची केळी, रताळे घाला.

५) त्यात शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.

६) त्यानंतर भिजवलेल्या पीठाची पोळी करा. त्याला काप देऊन त्याचे कोन भरून घ्या.

७) त्या कोनांमध्ये आपण बनवलेले सारण भरून कोनाची तोंड व्यवस्थित बंद करा.

८) त्यानंतर कढईतल्या तूपात हे सर्व कोन सोनेरी रंग प्राप्त होईपर्यंत तळून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या.

९) अशा प्रकारे गरमा गरम उपवासाचे समोसे (Fasting Samosas) तयार झाले. नारळाच्या चटणीसोबत हे समोसे खाऊ शकता.

पहा व्हिडीओ : १० मिनिटांत बनवा उपवासाचे फराळी पकोडे

या रेसिपी वाचल्या का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news