PM Modi Address to US Congress : चीनला खडसावले; दहशतवादवरून पाकिस्तानला सुनावले... PM मोदींच्या युएस काँग्रेस संबोधनातील महत्वाचे मुद्दे

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi Address to US Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.22) यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. युएस काँग्रेसला दोन वेळा संबोधित करणारे ते केवळ तिसरे जागतिक नेते ठरले. बराक ओबामा प्रशासनाच्या काळात 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते. यूएस सिनेटचे नेते चक शूमर आणि प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांनी पंतप्रधान मोदींचे कॅपिटल हिल येथे स्वागत केले. तिथे त्यांच्या सन्मानार्थ खासदारांकडून उभे राहून स्वागत मिळाले.
PM Modi Address to US Congress : यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान मोदींच्या भाषणा दरम्यान एकूण 15 स्थायी (उभे राहून) ओव्हेशन्स मिळाले तर 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात, भारत-अमेरिका संबंध, लोकशाही, दहशतवाद, भारत-चीन संबंध, युक्रेन युद्धावरील चिंता, आदी महत्वाच्या मुदद्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला केलेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे –
यूएस काँग्रेसला संबोधित करणे हा नेहमीच मोठा सन्मान असतो. असे दोनदा करणे हा एक अपवादात्मक विशेषाधिकार आहे. या सन्मानासाठी मी भारतातील १.४ अब्ज लोकांचे मनापासून आभार मानतो
सात उन्हाळ्यांपूर्वी मी इथे आलो तेव्हापासून बरेच काही बदलले आहे, परंतु भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्याच्या आमची वचनबद्धता सारखीच आहे.
आता, जेव्हा आमचे युग क्रॉसरोडवर आहे, तेव्हा मी या शतकाच्या आमच्या आवाहनाबद्दल बोलण्यासाठी आलो आहे.
गेल्या काही वर्षांत, AI – आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अनेक प्रगती झाली आहे. त्याच वेळी, आणखी एक AI (America-India) संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण विकास झाला आहे. अमेरिका-भारत संबंध अधिक दृढ झाले आहे. आमची विश्वासार्ह भागीदारी या नवीन पहाटेच्या सूर्यासारखी आहे जी सर्वत्र प्रकाश पसरवेल.
2016 मध्ये जेव्हा मी इथे होतो तेव्हा मी म्हणालो होतो की आमचे नाते एका महत्त्वपूर्ण भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, ते भविष्य आज आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता दोन्ही देशांवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदींना २६/११, ९/११ची आठवण करून देऊन दहशतवादाशी लढण्यासाठी एकत्रित लढायला हवे, असे म्हटले. युक्रेनमधील हिंसाचारावरही पंतप्रधानांनी भाष्य केले.
युक्रेन-रशिया युद्धावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की युद्धामुळे लोकांना त्रास होतो. दोन्ही देशांमधील युद्धाचा फटका विकसनशील देशांनाही बसला आहे. युद्धामुळे जागतिकीकरणालाही फटका बसला आहे. पुरवठा साखळी मर्यादित झाली आहे. पुरवठा साखळीचे विकेंद्रीकरण आणि लोकशाहीकरण करण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
चीन आणि पाकिस्तानबाबत ते म्हणाले की, संघर्षाचे काळे ढग इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरही परिणाम करत आहेत. प्रदेशातील स्थिरता ही आमची सामायिक चिंता आहे. आम्हाला एकत्र आनंद हवा आहे. मुंबईतील 9/11 आणि 26/11 च्या हल्ल्यांनंतरही कट्टरतावाद आणि दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी गंभीर धोका आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी कोणतेही ifs आणि buts नसावेत. दहशतवादाला प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध आणि दहशतवादाची निर्यात करणाऱ्यांविरुद्ध आपण एकत्र लढले पाहिजे. जग बदलत आहे. जगाला नवीन जागतिक व्यवस्थेची गरज आहे.
#WATCH | Our vision is ‘Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayaas’. We are focussing on infrastructure developments. We have given nearly 40 million homes to provide shelter to over 150 million people, which is nearly 6 times the population of Australia: Prime… pic.twitter.com/e6EFjlPity
— ANI (@ANI) June 22, 2023
हे ही वाचा :
ISRO-NASA : मोदी-बायडन भेटीत मोठा निर्णय! भारत-अमेरिका एकत्रित अवकाशात पाठवणार अंतराळवीर
Fighter Jet Engines :अमेरिकेबराेबर ऐतिहासिक करार, आता ‘F414 जेट’ इंजिन निर्मिती भारतातच हाेणार