Kolhapur protests | कोल्हापुरातील घटनेच्या निषेधार्थ औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन; मनसेच्या संदीप देशपांडेंसह ८ जणांवर गुन्हा | पुढारी

Kolhapur protests | कोल्हापुरातील घटनेच्या निषेधार्थ औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन; मनसेच्या संदीप देशपांडेंसह ८ जणांवर गुन्हा

पुढारी ऑनलाईन: औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी (दि.०८) बंद पुकारला. यानंतर याला हिंसक वळण लागले. याचे पडसाद कोल्हापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी उमटले. दरम्यान, मनसे नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूरातील घटनेच्या निषेधार्थ औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर ८ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button