WTC Final : खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच अश्विनला संघाबाहेर ठेवले : रोहित शर्मा | पुढारी

WTC Final : खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच अश्विनला संघाबाहेर ठेवले : रोहित शर्मा

लंडन : अश्विनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता, पण परिस्थिती लक्षात घेता त्याला चार वेगवान गोलंदाजांची निवड करावी लागली. रोहित शर्मा म्हणाला की, अश्विन हा मॅचविनर आहे यात वादच नाही आणि वर्षानुवर्षे तो आम्हाला सामने जिंकून देत आहे, पण आम्हाला संघाच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार आम्हाला अश्विनला संघात घेता आले नाही. (WTC Final 2023)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने रविचंद्रन अश्विनला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले. ओव्हलवर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनची घोषणा करताच अश्विनच्या चाहत्यांना वाईट वाटले. अश्विन हा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज आहे आणि असे असूनही त्याला फायनलच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. (WTC Final 2023)

ओव्हलच्या खेळपट्टीवरील गवत आणि तिथला बाऊन्स अश्विनच्या विरोधात गेला. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो, त्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवणे आवश्यक होते. त्यामुळे शार्दूलला स्थान मिळाले. गेल्या दोन वषार्र्ंत जडेजाने बॅटने ताकद दाखवली आहे आणि जाडेजा हा संघातील एकमेव डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे अश्विनपेक्षा जडेजावर संघाने विश्वास दाखवला.

हेही वाचा;

Back to top button