Amruta Fadnavis Bribe Case : बुकी जयसिंघानीच्या मुलीने अमृता फडणवीसांना दिली होती ‘मोठी ऑफर’; आरोपपत्रात नवीन खुलासे | पुढारी

Amruta Fadnavis Bribe Case : बुकी जयसिंघानीच्या मुलीने अमृता फडणवीसांना दिली होती 'मोठी ऑफर'; आरोपपत्रात नवीन खुलासे

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amruta Fadnavis Bribe Case : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि धमकावल्या प्रकरणी मुख्य आरोपी बुकी जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी चार्जशीट/आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पोलिसांकडून नवीन खुलासे समोर आले आहेत. चार्जशीटमध्ये म्हट्ल्याप्रमाणे अनिक्षा जयसिंघानी हीने पोलिसांना सट्टेबाजांची माहिती देऊन मोठी रक्कम कमाऊ शकतो, अशा प्रकारची मोठी ऑफर अमृता यांना दिली होती.

मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयासमोर नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. ७९३ पानांचे हे दस्तावेज आहेत. यामध्ये अमृता फडणवीस आणि जयसिंघानी परिवार यांच्यात झालेले अनेक टेलीफोन चॅट सूचीबद्ध आहे. सट्टेबाज अनिल जयसिंघानी त्याची मुलगी अनीक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांच्यावर लाच मागणे आणि अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहे. दोघांवर भारतीय दंड संहिता (आईपीसी) कलम -१२० बी आणि ३८५ जबरी वसुली आणि भ्रष्टाचार थांबविण्याचे अधिनियम ८ आणि १२ ही कलमे लावण्यात आली आहेत. Amruta Fadnavis Bribe Case

अमृता फडणवीस यांना धमकावणे आणि लाच दिल्याप्रकरणी बुकी जयसिंघानियाची मुलगी अनिक्षाला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने 27 मार्च रोजी या प्रकरणात तिला जामीन मंजूर केला होता. अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. Amruta Fadnavis Bribe Case

हे ही वाचा :

Anil Jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Amruta Fadnavis extortion case | अमृता फडणवीस धमकी प्रकरणात ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल

Back to top button